आभाळ कोसळे जेव्हा आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा
छाया न पित्याची पाठी आइची न दिसली माया
छाया न पित्याची पाठी आइची न दिसली माया
पालवीहि फुटण्याआधी वठलेली अमुची काया
या दगडी भिंतीपुढती रडगाणे कुठवर गावे
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा
चत्कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही
चत्कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही
असहाय साखळ्या भारी आहेत आमुच्या पायी
कोणाच्या पुढती अमुचे कोणाच्या पुढती अमुचे चिमुकले हात पसरावे
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा
बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
जातसे जीवही ज्याने तो खेळच दुर्जनतेचा
तुटलेल्या माळेमधले मणि फिरुनी कसे जुळावे
आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे
सारे जग रुसल्यावरती सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे
आभाळ कोसळे जेव्हा