दमलेला जीव पुन्हा उमलून येई
कानी येते हाक जेव्हा
आई आई आई
दमलेला जीव पुन्हा उमलून येई
कानी येते हाक जेव्हा
आई आई आई
आई आई आई आई आई आई आई
पोटासाठी जरी रोज हिंडते पाउल
कान घेती क्षणक्षण पिलांची चाहूल
पोटासाठी जरी रोज हिंडते पाउल
कान घेती क्षणक्षण पिलांची चाहूल
झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा
मन जागे जागे राही
कानी येते हाक जेव्हा आई आई आई
आई आई आई आई आई आई आई आई
मऊ कुशीतून बळ पोलादाचे देते
घास भरवाया उगा बोबडे बोलते
भातुकलीमध्ये संसार मांडते
रातभर थोपटते अंगाई जागते
हिच्या डोळ्यातला हिच्या डोळ्यातला
चंद्र मावळत नाही
कानी येते हाक जेव्हा आई आई आई
सगळे दुर्घट झाले असते संसारी
नसतीस जर तू इथे माझी कैवारी
कैशी घडली असती जन्माची वारी
पोशियाले जर नसते मज तू तव उदरी
आई जय आई
आई जय आई तू जगनी सुखदायी
त्रयलोक्यातून अवघ्या करुणा तव नाही
आई जय आई
प्रसन्नवदना करुणा सत्पर तव तत्पर
बोल शुभंकर निशिदिन मुद्रा अव्यनकर
सर्व जना चरणा ते सुक्रूप सुखदामि
शोधीत तुजला येतो स्वर्गाची विश्रामी
आई जय आई
आई जय आई तू जगनी सुखदायी
त्रयलोक्यातून अवघ्या करुणा तव नाही
आई जय आई
श्रीमंती बहु त्याला जन्म सुखी त्याचा
ढळतो ज्यावर वारा तुझिया पदराचा
श्वासाश्वासामागे उभि तव पुण्याई
सार चार वेदांचे गाई अंगाई
आई जय आई आई आई आई आई आई आई
आई आई आई आई आई आई आई आई आई
आई आई आई आई आई आई आई