आ आ आ आ आ आ
स्नान करिती लोचने अश्रुंनी पुन्हा पुन्हा
अश्रुंनी पुन्हा पुन्हा
शेषशयन श्रीधरा शेषशयन श्रीधरा
दृष्टी अधीर दर्शना
स्नान करिती लोचने
नील या नभाकडे मी भुलून पाहते
मीन होउनी तनू निळ्या जळात पोहते
नीलकमल पाहता तूच भाससी मना
स्नान करिती लोचने
तुझाच श्वास झेलुनी वसंत गंध उधळितो
तुझेच तेज घेउनी सूर्य विश्व उजळितो
सूर्य विश्व उजळितो
तुझे स्वरूप रेखिता मूक होई कल्पना
स्नान करिती लोचने
लोचनांस लागले वेड रे निळे निळे
दृष्टी रूप रंगवी तुझे सुरम्य सावळे
जन्मपुष्प हे फुले प्रिया तुझ्याच पूजना
स्नान करिती लोचने
अश्रुंनी पुन्हा पुन्हा
शेषशयन श्रीधरा
दृष्टी अधीर दर्शना
स्नान करिती लोचने