अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा
दरीदरीतून मावळ देवा, देऊळ सोडून धाव रे
अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत (अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत)
तुझ्या शिवारी जगले, हसले
कडी, कपारी, अमृत प्याले
तुझ्या शिवारी जगले, हसले
कडी, कपारी, अमृत प्याले
आता हे परि सारे सरले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव
सोडून जाते गाव रे
अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत (अखेरचा हा तुला दंडवत, तुला दंडवत)
हाय सोडूनी जाते आता ओढून नेली जैसी सीता
हाय सोडूनी जाते आता ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता
कुणी न उरला वाली आता,
धरती दे गं ठाव
सोडून जाते गाव रे
अखेरचा हा तुला दंडवत
सोडून जाते गाव
दरीदरीतून मावळ देवा
दरीदरीतून मावळ देवा,
देऊळ सोडून धाव रे
अखेरचा हा तुला दंडवत, (अखेरचा हा तुला दंडवत)
तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत, तुला दंडवत