कोण दुजा आधार तुजविण
तुजविण कोण दुजा आधार
कोण दुजा आधार
अवतीभवती पहा दाटला अवसेचा अंधार
काजळले नभ काजळले मन
काजळले नभ काजळले मन व्याकुळले मी फार
कोण दुजा आधार तुजविण
कोण दुजा आधार
वादळवारा झोंबत अंगा
वादळवारा झोंबत अंगा झिंगुनि हा अनिवार
पदराखाली इवली दिवली थरथरते हळुवार
कोण दुजा आधार
कशि सावरू कुठे निवारा घालु कुणावर भार
कशि सावरू कुठे निवारा घालु कुणावर भार
पतितपावना एक तुझे मज
पतितपावना एक तुझे मज उघडे आता दार
कोण दुजा आधार