तूच खरा आधार
देवा तूच खरा आधार
देवा तूच खरा आधार
तुझ्या कृपेची तुझ्या दयेची
तुझ्या कृपेची तुझ्या दयेची
किमया अपरंपार
तूच खरा आधार
देवा तूच खरा आधार
भयाण सुटता वादळवारा
तुझ्या कृपेने दिसे-किनारा
भयाण सुटता वादळवारा
तुझ्या कृपेने दिसे किनारा
हाकारून ही जीवननौका तूच नेशील पार
तूच खरा आधार
देवा तूच खरा आधार
हृदयी भडकता दाहक ज्वाला
तूच शमविसी आग दयाळा
हृदयी भडकता दाहक ज्वाला
तूच शमविसी आग दयाळा
तुझ्या दयेची मेघमालिका वर्षवी अमृतधार
तूच खरा आधार देवा तूच खरा आधार