आई, माझ्या लग्नाची गं
का तुलाचं पडली घाई
बाबा, माझ्या लग्नाची हो
का तुम्हांस पडली घाई
कुणीतरी
अहो कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालचं नाही
कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालंच नाही
झाले का हो डोई जड मी
अशा कोवळ्या वयात
नुकतच पहिलं पाऊल पडलं
तरुण पणात, तरुण पणात
ओठ दुधाचे न सुकले
काय कुठे मी चुकले
माझं मलाचं कळलं नाही
हौस न मजला नटण्याची
अहो मी तर साधी भोळी
हवी कशाला इतक्यातचं ही
साडी अन् चोळी, साडी अन् चोळी
गाठ कशी बाई सुटली
नको तिथं ही तुटली
कोड मलाच सुटलं नाही
काल रातीच्या सपनामंदी
एक पाहिली वरात
आज कशी मी अवचित आले
ज्वानीच्या भरात, ज्वानीच्या भरात
सांग कुठे ती लपवू
नजर कशी मी चुकवू
जो तो मलाच निरखून पाही
आई, माझ्या लग्नाची गं
का तुलांच पडली घाई
बाबा, माझ्या लग्नाची हो
का तुम्हांस पडली घाई
कुणीतरी
अहो कुणीतरी समजावा ना बाई
माझं वय काय झालंच नाही