थाट आईचा बघून भारी
मोहित झाले खरीन बाई ग मनामधी
हा थाट आईचा बघून भारी
मोहित झाले खरीन बाई ग मनामधी
देवी माझी दंग झाली
शिलांगणाच्या खेळामधी
देवी माझी दंग झाली
शिलांगणाच्या खेळामधी
अगं पटा पटा सोनं लुटा
दर्शन घेण्यासाठी झटा ग
पटा पटा सोनं लुटा
दर्शन घेण्यासाठी झटा
गाऊया नाचूया सोनं वेचूया
लोळुया धणामधी
पुनवेच्या या दिशी ग होईल
खुशी या मंगल सनामधी
देवी माझी दंग झाली
शिलांगणाच्या खेळामधी
देवी माझी दंग झाली
शिलांगणाच्या खेळामधी
विजयादशमी हाच दिवस तो
महान ठरला भूमी वरी
महान ठरला भूमी वरी
आई भवानी त्रिशूळानं
म्हैशासुरला ठार करी
म्हैशासुरला ठार करी
स्वर्ग मधले देव ही तेव्हा
फुले उधळती रणावरी
देवी माझी दंग झाली
शिलांगणाच्या खेळामधी
अगं पटा पटा सोनं लुटा
दर्शन घेण्यासाठी झटा ग
पटा पटा सोनं लुटा
दर्शन घेण्यासाठी झटा
देवी माझी दंग झाली
शिलांगणाच्या खेळामधी
देवी माझी दंग झाली
शिलांगणाच्या खेळामधी