छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
ताल धिनक् धिन भिनला अंगी
गोपी भिजल्या हरीच्या रंगी
वेडी झाली राधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
यमुनेच्या त्या तीरावरती गोपी
अशा जलक्रीडा करिती
यमुनेच्या त्या तीरावरती गोपी
अशा जलक्रीडा करिती
अवचित येता कृष्ण कन्हैय्या
अवचित येता कृष्ण कन्हैय्या
झाली त्रेधा त्रेधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
नटखट कान्हा खोड्या करितो
फोडुनी मटका लोणी चोरितो
नटखट कान्हा खोड्या करितो
फोडुनी मटका लोणी चोरितो
नटखट कान्हा खोड्या करितो
फोडुनी मटका लोणी चोरितो
रागे भरिता गोड हासुनी रागे भरिता गोड हासुनी
लावितसे गोकुळ नादा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
ताल धिनक् धिन भिनला अंगी
गोपी भिजल्या हरीच्या रंगी
वेडी झाली राधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा