पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
माहेरच्या दिसांचा माहेरच्या दिसांचा
क्षण काळ भास झाला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
ओलीसुकी सुखाची बोली मुकी मुखाची
घाटात वाट होती कोंदाटल्या धुक्याची
आला वळीव आता आला वळीव आता
आला वळीव आता हा नेमका कशाला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
हुंकारत्या दिशांना फुटले निळे धुमारे
बघ गारवा थरारे उबदार हे शहारे
रेंगाळत्या धुपाने रेंगाळत्या धुपाने
रेंगाळत्या धुपाने गाभारले मनाला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
मेघांमधुन आले मेघांमधुन आले
हे ऊन कोवळेसे
ओसंडले सभोवती आकाश सावळेसे
वृंदावनात आला वृंदावनात आला
वृंदावनात आला गोपाळकृष्ण काळा
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
माहेरच्या दिसांचा माहेरच्या दिसांचा
क्षण काळ भास झाला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला
पहिल्याच सरीचा ओला सुवास आला