उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी
लिंगदेह लंकापुरि विध्वंसूनी
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी
देह अहंभाव रावण निवटोनी
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्धभावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला
लंका दहन करुनी अखया मारिला
मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला
आनंदाची गुढी घेउनियां आला
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्धभावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
निजबळें निजशक्ति सोडविली सीता
म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा
आनंदें वोसंडे वैराग्य भरता
आरती घेउनि आली कौसल्या माता
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्धभावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
अनुहतवादित्रध्वनि गर्जति अपार
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार
अयोध्येसी आले दशरथकुमार
नगरीं होत आहे आनंद थोर
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्धभावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव
सहज सिंहासनीं राजा रघुवीर
सोहंभावें तया पूजा उपचार
सहजांची आरती वाद्यांचा गजर
माधवदासा स्वामी आठवे ना विसर
जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्धभावे आरती परिपूर्णकामा
जय देव जय देव