सलते काही बोच मनी
सलते काही बोच मनी
का सवाल छळतो तोच मनी
तोच मनी
सलते का हे बोच मनी
हृदयी राधा स्वप्नी मीरा
ओठांवरती बनसुरीया
सहस्त्र सोळा कन्यावरसी
कारे माझ्या कृष्ण प्रिया
तुळस मी साधी जणू अपराधी
उंबरठ्याची ठेच मनी
का सवाल छळतो तोच मनी
तोच मनी
सलते का हि बोच मनी
नकळे का हे होते असे रे
नकळे का हे होते असे रे
शाहणाल्याही लागी पिसे रे
अंतरांची प्रीत अंतराची रीत
आंतरिक तेच मनी
का सवाल छळतो तोच मनी
हा हा हा सलते का हे बोच मनी