आभाळ फाटलेले टाका कुठे भरू मी
आता कसे करु मी
आता कसे करु मी
स्वप्नी चितारलेल्या झाल्या विराण जागा
स्वप्नी चितारलेल्या झाल्या विराण जागा
वाहून पार गेल्या वाळुवरील रेघा
पाण्यात त्या मिळाल्या त्यांना कशी धरू मी
आता कसे करु मी
आता कसे करु मी
जो मित्र पाठिराखा तो होय पाठमोरा
साऱ्या मनोरथांचा तो ढासळी मनोरा
आयुष्य कोसळे हे त्या काय सावरू मी
आता कसे करु मी
आता कसे करु मी
प्रीतीविना जिवाची पंखाविना भरारी
आधार ना निवारा आता दिशात चारी
ना अर्थ या जिण्याला का व्यर्थ वावरु मी
आता कसे करु मी
आता कसे करु मी
आभाळ फाटलेले टाका कुठे भरू मी
आता कसे करु मी
आता कसे करु मी