देव नाही मंदिरी
देव नाही मंदिरी
फुल आहे गंध आहे
भाव आहे अंतरी
देव नाही मंदिरी
देव नाही मंदिरी
आसरा ज्याचा धरावा
वृक्ष का तो उन्मळावा
आसरा ज्याचा धरावा
वृक्ष का तो उन्मळावा
पक्षिणी बाळासवे ही झुरत राहे कोटरी
देव नाही मंदिरी
देव नाही मंदिरी
चालली ही आज नौका
वादळाचा भयद धोखा
चालली ही आज नौका
वादळाचा हा भयद धोखा
एकटी मी झुंज देते जीवनाच्या संगरी
देव नाही मंदिरी
देव नाही मंदिरी
फुल आहे गंध आहे
भाव आहे अंतरी
देव नाही मंदिरी
देव नाही मंदिरी