घोटापाठी घोट सुखाचा पिऊन घे राजसा आ आ आ
पिऊन घे राजसा
उद्याचा कोण धरी भरवसा
उद्याचा कोण धरी भरवसा
उद्याचा कोण धरी भरवसा
एकच हसणे हसून चुकते वेलीवरची कळी वेलीवरची कळी
एकच उसळी घेऊन फुटती डोंगरलाटा जळी डोंगरलाटा जळी
एक रात्र ही त्या उंचीची एक रात्र ही त्या उंचीची
जवळ नशेचा शिसा नशेचा शिसा
उद्याचा कोण धरी भरवसा
उद्याचा कोण धरी भरवसा
फूल शेजेवर सुगंध रचतो मऊपणाचे थर
फूल शेजेवर सुगंध रचतो मऊपणाचे थर
खिडकीमधुनी झुळूक उडवी चैत्राचे अत्तर
नको विजेचा दिवा सजना आ आ आ
नको विजेचा दिवा पडु दे
चांदाचा कवडसा चांदाचा कवडसा
उद्याचा कोण धरी भरवसा
उद्याचा कोण धरी भरवसा