करु देत शृंगार सख्यांनो करु देत शृंगार
करु देत शृंगार सख्यांनो करु देत शृंगार
अग्निवाचून आज करितसे
अग्निवाचून आज करितसे राजपुती जोहार
करु देत शृंगार सख्यांनो करु देत शृंगार
जिवंत पती मी सती जातसे
जिवंत पती मी सती जातसे
भाग्य लाभले कुणा कधी असे
मृदुल मृदुल तर या कमलांचा यज्ञी स्वाहाकार
करु देत शृंगार सख्यांनो करु देत शृंगार
ही भाग्याची वेळ साजणी
ही भाग्याची वेळ साजणी
भांग भरा गं गुंफा वेणी
राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रुधार
करु देत शृंगार सख्यांनो करु देत शृंगार
मला न माहीत कोण यवन तो
मला न माहीत कोण यवन तो
कोण जाणते मृत्यु काय तो
हासत हासत मिठी मरणाला हा अमुचा संसार
करु देत शृंगार सख्यांनो करु देत शृंगार