सासरच्या घरी आले माहेर माहेरा
सासरच्या घरी आले माहेर माहेरा
माय काय सासू झाली
माय काय सासू झाली
पिता तो सासरा
सासरच्या घरी आले माहेर माहेरा
हवे तेच लाभले मजसी हवे तेच त्यांना
हो हवे तेच लाभले मजसी हवे तेच त्यांना
मूर्तरूप आले मनीच्या मुक्या कल्पनांना
उभय मानसांच्या वेला बहरला फुलोरा
बहरला फुलोरा
सासरच्या घरी आले माहेर माहेरा
उणेपणा नाही तिळही राहिला सुखाला
उणेपणा नाही तिळही राहिला सुखाला
मेण होऊनिया जडले भाग्य कुंकवाला
हो भाग्य कुंकवाला
सौख्यसागरासी नाही राहिला किनारा
राहिला किनारा
सासरच्या घरी आले माहेर माहेरा
सासरच्या घरी आले माहेर माहेरा
माय काय सासू झाली
पिता तो सासरा
सासरच्या घरी आले माहेर माहेरा