आ आ आ आ
ओठांत हाक येते सानंद गीत गाता
आ आ आ आ
येणार नाथ आता येणार नाथ आता
येणार नाथ आता येणार नाथ आता
मी पाऊले पहाते दारात थांबलेली
ये अंगणात छाया आधीच लांबलेली
मी पाऊले पहाते दारात थांबलेली
ये अंगणात छाया आधीच लांबलेली
लग्नात लाभलेला हो स्पर्श भास हाता
येणार नाथ आता येणार नाथ आता
आली फुलून गात्रे ये प्राण लोचनांत
आ आ आ आ
आली फुलून गात्रे ये प्राण लोचनांत
सारे मुहूर्त आले एका खुळया मनात
धारेत अमृताच्या गेला भिजून माथा
येणार नाथ आता येणार नाथ आता
आता नका क्षणांनो आ आ आ आ
आता नका क्षणांनो दोघांत भिंत घालू
स्वर्गासवे मला द्या भूमीवरुन चालू
ते प्राणनाथ माझे मी दैवदत्त कांता
येणार नाथ आता येणार नाथ आता
येणार नाथ आता येणार नाथ आता
येणार नाथ आता येणार नाथ आता
येणार नाथ आता अ आ