हा ज्ञानेश्वर माउलींचा अभंग
आ आ आ आ
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती
रत्नकीळ फांकती प्रभा
अगणित लावण्य तेज पुंजाळले
अगणित लावण्य तेज पुंजाळले
न वर्णवे तेथींची शोभा
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियेला वेधु
खोळ बुंथी घेउनी खुणाची पालवी
खोळ बुंथी घेउनी खुणाची पालवी
आळविल्या नेदी सादु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियेला वेधु
शब्देविण संवादु दुजेंवीण अनुवादु
शब्देविण संवादु दुजेंवीण अनुवादु
हे तवः'कैसेंनि गमे
परेहि परतें बोलणे खुंटले
वैखरी कैसेनि सांगे वैखरी कैसेनि सांगे
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियेला वेधु
पाया पडूं गेले तव पाउलचि न दिसे
पाया पडूं गेले तव पाउलचि न दिसे
उभाचि स्वयंभु असे
समोर की पाठिमोरा न कळे
समोर की पाठिमोरा न कळे
टकची पडिले कैसें
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियेला वेधु
क्षेमालागी जीव उतावीळ माझा
क्षेमालागी जीव उतावीळ माझा
म्हणवूनि स्फुरताती बाहो
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी ऐकली
क्षेम देऊं गेलें तंव मीचि मी ऐकली
आसावला जीव रावो
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
कानडा वो विठ्ठलु कर्नाटकु
येणें मज लावियेला वेधु