भ्र्रर्रर्रर्र
गुलजार गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी
नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा भ्र्रर्रर्रर्र
सडसडीत सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
सडसडीत बांधा उभा सुरत गोरटी
भिरिभिरी भिरिभिरी शोधते कुणा
भिरिभिरी भिरिभिरी शोधते कुणा नजर चोरटी
चोळी माझी चोळी माझी चंदनी तंग तंग पैठणी
चुणीवर चुणी चुणी उडवी पदरा पदरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा भ्र्रर्रर्रर्र
डाळिंब फुटे ओठांत
डाळिंब फुटे ओठांत गालांमध्ये लाज
मी तरुणपणाचा जपून घेते अंदाज
जपून घेते अंदाज
छुम छनन छुमछुम बोले चाळ नागमोडी माझी चाल
भवतीनं सूरताल मारती चकरा चकरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा भ्र्रर्रर्रर्र
बेभान बेभान नाचते रूपगुणाची राणी
बेभान नाचते रूपगुणाची राणी
ऊर होतो खालीवर बाई
ऊर होतो खालीवर बाई पारव्यावाणी
अडवुनी अडवुनी जागोजाग बळजोरी नगं नगं
जाते बाई लगबग सख्याच्या नगरा नगरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी
नाचते मी घडी घडी करते नखरा नखरा
बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई ग माझ्या पायाला बांधलाय भवरा
बाई बाई बाई माझ्या पायाला बांधलाय भवरा भ्र्रर्रर्रर्र