मी भीक मागणारी दातार तू उदार
झोळीत टाकलासी का शेवटी नकार
मी भीक मागणारी
मज आस आसऱ्याची आश्वासिलेस तु ही
होकार तोच आता गर्जे कठोर नाही
कुरवाळुनी कशाला केलास हा प्रहार
झोळीत टाकलासी का शेवटी नकार
मी भीक मागणारी
राजीव लोचनांच्या मी पिंजऱ्यात होते
डोळ्यांत भाव भोळा ओठांत गोड गीते
पाळीव पाखराची केलीस का शिकार
झोळीत टाकलासी का शेवटी नकार
मी भीक मागणारी
आता कुठे फिरू मी पंखात जोम नाही
सारे दिले तुला मी मज राहिले न काही
एका तुझ्याविना हे जग पेटले शिवार
झोळीत टाकलासी का शेवटी नकार
मी भीक मागणारी