श्रावण आला ग वनी
श्रावण आला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला
दरवळे गंध मधूर ओला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला आलाआला
एकलीच मी उभी अंगणी
उगीच कुणाला आणित स्मरणी
चार दिशांनी जमल्या तोवर
गगनी घनमाला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला आलाआला
उरात नवख्या भरे शिर्शिरी
उरात नवख्या भरे शिर्शिरी
शिरशिर करी नृत्य शरीरी
शिरशिर करी नृत्य शरीरी
सूर कुठून ये मल्हाराचा
सूर कुठून ये मल्हाराचा
पदर कुणी धरिला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला आला आला
समीप कुणी आले, झुकले
समीप कुणी आले, झुकले
किती धिटावा ओठ टेकले
किती धिटावा ओठ टेकले
मृदुंग की ती वीज वाजते आ आ आ आ आ
भास तरी कसला आ आ आ
श्रावण आला ग वनी
श्रावण आला
श्रावण आला ग वनी
श्रावण आला