तुला पाहते रे तुला पाहते
तुला पाहते रे तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे
तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी नाहते रे
तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत जागेपणीही
किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत जागेपणीही
उणे लोचनांचे सुखे साहते रे
तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
कधी भक्त का पाहातो ईश्वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
कधी भक्त का पाहातो ईश्वराला
नदी न्याहळी का कधी सागराला
तिच्या सारखी मी सदा वाहते रे
तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे
तुला पाहते रे तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते