आसू भरल्या पापण्या ओल्या
चालावे किती प्रश्न हा पुन्हा
सावल्या सरल्या वाटा पार भरकटल्या
शोधाव्या किती हरवल्या खुणा
फरफट चाले भासांची
घुसमट होते श्वासांची
वणवण भटकतो एकटा पुन्हा
दाटे धुके भोवती
फसवे आज का माझ्या मना
झाली सजा का अशी
घडला हा काय माझा गुन्हा
चाललो मी कुठे ना कळे काही
सोबती एक ही सावली नाही
हुंदका दाटला आज का माझा
चाहुलीं भोवती पाऊले नाही
उलगडले ना काहीही
गुरफटल्या दिशा दाही
वणवण भटकतो एकटा पुन्हा
दाटे धुके भोवती
फसवे का आज माझ्या मना
झाली सजा का अशी
घडला हा काय माझा गुन्हा
चेहरा आपला ना केव्हा कुठे दिसला
बदलावा किती रोज आरसा
दोन वळणे ही ओळख ना सुचे काही
गर्दीतून ह्या हरवला ठसा
हो चांद ना सापडे सांज च्या वेळी
का अशी याद हि या जिवा जाळी
कोरडा वंद आज का सोसणं
दाटली आसवे वाहती झाली
नकळत वावटळ उठते
भवरा जिंदगी होते
वणवण भटकतो एकटा पुन्हा
दाटे धुके भोवती
फसवे आज का माझ्या मना
झाली सजा का अशी
घडला हा काय माझा गुन्हा