पाहुणा म्हणूनी आला जरा घरात थारा दिला आ आ आ
दांडगाई करुनी ग बाई ओ ओ ओ चार दिसात घरधनी झाला
पाहुणा म्हणूनी आला
भोळिस भासला भोळा
साधाच आणि मनमोकळा
भोळिस भासला भोळा
साधाच आणि मनमोकळा
परि अंगात नाना कळा
परि अंगात नाना कळा
डोळ्यास लावता डोळा ओ ओ ओ
मज पुरता कावा कळला
पाहुणा म्हणूनी आला जरा घरात थारा दिला आ आ आ
दांडगाई करुनी ग बाई ओ ओ ओ चार दिसात घरधनी झाला
पाहुणा म्हणूनी आला
पचताच पहिली ही खोडी
करी खुशाल लाडीगोडी
पचताच पहिली ही खोडी
करी खुशाल लाडीगोडी
हृदयीचे कुलुपही तोडी
हृदयीचे कुलुपही तोडी
भर दिवसा करी घरफोडी ओ ओ ओ
चोरटा घरामधी घुसला
पाहुणा म्हणूनी आला जरा घरात थारा दिला आ आ आ
दांडगाई करुनी ग बाई ओ ओ ओ चार दिसात घरधनी झाला
पाहुणा म्हणूनी आला