रघुनंदन आले आले
रघुनंदन आले आले
धरणी माता कानी बोले
धरणी माता कानी बोले
शिरीष कुसुमाहुनीही कोमल
शिरीष कुसुमाहुनीही कोमल
कोमेजुन ही काया जाईल
कोमेजुन ही काया जाईल
सप्तस्वर्ग तो लवुनी खाली
धरुनि चालला छ्त्र साउली
रविचा रथ हळुहळु चाले
रविचा रथ हळुहळु चाले
रघुनंदन आले आले
धरणी माता कानी बोले
वृक्षलतांनो हृदय फुलांच्या
वृक्षलतांनो हृदय फुलांच्या
चरणाखाली रघुरायाच्या
चरणाखाली रघुरायाच्या
पायघड्या या लवकर घाला
माझ्यासाठी सांगा त्याला
शिळा अहिल्या हो झाले
शिळा अहिल्या हो झाले
रघुनंदन आले आले
धरणी माता कानी बोले
पाउलातली धूळ होऊनी
पाउलातली धूळ होऊनी
बसली होती ती संजीवनी
बसली होती ती संजीवनी
भाळी लावता होइन पावन
आणिक रामा तुझेच दर्शन
धन्य मी पतिता झाले
धन्य मी पतिता झाले
रघुनंदन आले आले
रघुनंदन आले आले
धरणी माता कानी बोले
धरणी माता कानी बोले