हा महाल कसला
रान झाडी हि दाट
अंधार रातीचा
कुठ दिसणा वाट
कुण्या द्वाडान घातला घावं
केली कशी करणी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
काजळ काळी गर्द रात अन
कंप कंप अंगात
सळ सळनाऱ्या पानांना ही
रात किड्यांची साथ
कुठ लपू मीकशी लपू मी
गेले भांबावूनी भांबावूनी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
गुपित उमटले चेहऱ्यावरती
भाव आगळे डोळ्यात
पाश गुंतले नियतीचे रे
तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठ पळू मी कशी पळू मी
गेले मी हरवूनी मी हरवूनी
सख्या रे सख्या रे
सख्या रे घायाळ मी हरिणी
सख्या रे घायाळ मी हरिणी