[ Featuring ]
होता संभ्रम आम्हाला गझलांच्या चाहत्यांना
होता संभ्रम आम्हाला गझलांच्या चाहत्यांना
उर्दू भाषेचा हा ठेवा कसा मराठीत यावा कसा मराठीत यावा
उर्दू आहे ऐटबाज आणि रगेल रंगेल
उर्दू आहे ऐटबाज आणि रगेल रंगेल
आमुच्या या मराठीला ती कशी पेलवेल
उरी उर्मी होती एक मराठीच्याअषिकांना
उरी उर्मी होती एक मराठीच्या अषिकांना
समजेल का कुणी आमच्या बाव भावनांना
आणि नागपुरी एक समशेर दाद घेई
आणि नागपुरी एक समशेर दाद घेई
करी एल्गार शब्दांचा मन भिडुनिया जाई
करी एल्गार शब्दांचा मन भिडुनिया जाई
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी मी उभाच होतो
कुठेतरी दैव नेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
कुठेतरी पाहिले तुला मी जरी तुझे नाव आठवेना
कुठेतरी पाहिले तुला मी जरी तुझे नाव आठवेना
करू तरी काय हाय तेव्हा करू तरी काय हाय तेव्हा
खरेच डोळे नशेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
जरी जिवाला नकोनकोशी हयात हासून काढली मी
निदान जे दु:ख सोसले ते निदान जे दु:ख सोसले ते
सुखात होते मजेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
बघून रस्त्यावरील गर्दी कशास मी पाहण्यास गेलो
बघून रस्त्यावरील गर्दी बघून रस्त्यावरील गर्दी
कशास मी पाहण्यास गेलो
धुळीत बेवारशी कधीचे धुळीत बेवारशी कधीचे
पडून माझेच प्रेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी मी उभाच होतो
कुठेतरी दैव नेत होते
मनाप्रमाणे जगावयाचे कितीकिती छान बेत होते
कितीकिती छान बेत होते कितीकिती छान बेत होते