एकदा येऊन जा तू एकदा भेटून जा
मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगून जा
हा एकदा येऊन जा
मीलनाचे चित्र होते अंतरी मी रेखिले
मी तुझ्यामाझ्यात होते विश्व सारे देखिले
आज सीमा त्या जगाची तूच ओलांडून जा
मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगून जा
हा एकदा येऊन जा
शेवटी संपून गेली स्वप्नसुंदर ती कथा
मी तरी कुरवाळतो जपतो उरी वेडी व्यथा
आठवावे मीचे ते विसरू कसा सांगून जा
मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगून जा
हा एकदा येऊन जा