चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
ह्म्म्म हम्म
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफटून बसली
काही केल्या फुलेना जरा सुद्धा फुलेना
झाऱ्यानं टोचलं ते ही तिला बोचलं
अशी थट्टा पुरीच्या काळजाला ठसली
ह्म्म्म हम्म हम्म हम्म
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
पुरी झाली लाल तिचे फुगले गाल
मन आले भरू डोळे लागले झरू
पुरी झाली लाल तिचे फुगले गाल
मन आले भरू डोळे लागले झरू
इथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली
ह्म्म्म हम्म हम्म हम्म
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
ह्म्म्म हम्म
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफटून बसली
काही केल्या फुलेना जरा सुद्धा फुलेना
झाऱ्यानं टोचलं ते ही तिला बोचलं
अशी थट्टा पुरीच्या काळजाला ठसली
ह्म्म्म हम्म हम्म हम्म
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
ह्म्म्म हम्म
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
खीर थंड झाली वाटीत बसून आली
लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली
पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे
माझे म्हणणे ऐक गडे पण अ हं
चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली
ह्म्म्म हम्म हम्म हम्म
चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
इकडून ताई आली तिने युक्ती केली
खिरीची नि पुरीची खुप गट्टी झाली
इकडून ताई आली तिने युक्ती केली
खिरीची नि पुरीची खुप गट्टी झाली
तेव्हा पासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली
कढईतली पुरी मग कधी नाही रुसली