सांगतो गोष्ट ही
एका छोट्या पिल्ला ची
सांगतो गोष्ट ही
कावर् या बावर् या
एका छोट्या पिल्ला ची
सांगतो गोष्ट ही
वाटे उडावे पण सोबती कुणीही नाही
एकटे स्वतःशी रडते
टोचती बोचती चिडतात त्याच्यावरती बाबा हे
भासे परके का घरटे
जपते बाळाचे हसने आई पंखाशी घेई
दाखवते उडण्याची स्वप्ने
मिटणार् या पापनीला चिऊताई गाते अंगाई
दाखवते उडण्याची स्वप्ने
धडधडे काळीज ते इवले
थरथरे अन् ते भिरभिरले
फडफडे पंखास ते थकले
मनाच्या राणी वनवा लागे कसा
वाटे उडावे पण सोबती कुणीही नाही
एकटे स्वताशी रडते
टोचती बोचती चिडतात त्याच्यावरती बाबा हे
भासे परके का घरटे
जपते बाळाचे हसने आई पंखाशी घेई
दाखवते उडण्याची स्वप्ने
मिटणार् या पापनीला चिऊताई गाते अंगाई
दाखवते उडण्याची स्वप्ने
बघता बघता दुःखी क्षण संपले
उडता उडता आभाळाला भिडे
जगता जगता कळला हे कळे संगीताची
जादू ही न्यारी रे
छेडे सुरना अन् सोबती गाते ही दुनिया
उंच उंच अभाळी उडते
मित्र ही खेळती गोंजारतात त्याला बाबा ही
स्वच्छंदी पिल्लू बागडते
जपते बाळाचे हसने आई पंखाशी घेई
दाखवते उडण्याची स्वप्ने
मिटणार् या पापनीला चिऊताई गाते अंगाई
दाखवते उडण्याची स्वप्ने
जपते बाळाचे हसने आई पंखाशी घेई
दाखवते उडण्याची स्वप्ने
मिटणार् या पापनीला चिऊताई गाते अंगाई
दाखवते उडण्याची स्वप्ने
सांगतो गोष्ट ही