कृष्णाचा जन्म म्हणजे एक दिलासा आहे
दुःखाला मिळालेलं सांत्वन आहे
शुभाचं आश्वासन आहे
अंधाऱ्या रात्री भेभान वादळ वाऱ्यात
आणि कडाडून कोसळणाऱ्या पावसात
जन्माला कृष्णा बंदिशाहीत जन्माला
पण त्याच्या जन्मातच मुक्तीचं आश्वासन होतं
दोन मातांना धन्य करीत तो वाढला
आणि इथल्या घराघरातल्या प्रत्येक आईला
यशोदा करीत तिचा खट्याळ बाळ जाला
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
हा इवलासा बाळ सावळा
हा नंदाचा कंद कोवळा
हा इवलासा बाळ सावळा
हा नंदाचा कंद कोवळा
सखि याच्या खेळाला झाले थिटे नभाचे अंगण ग
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
हा वाऱ्यापरी येतो जातो
दही दूध लोणी चोरून खातो
हा वाऱ्यापरी येतो जातो
दही दूध लोणी चोरून खातो
भारी अवखळ भारी अचपळ
भारी अवखळ भारी अचपळ
माझा हा यदुनंदन ग
हा यदुनंदन ग
हा यदुनंदन ग
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
मी म्हणते हे माझे छकुले
माझ्या पोटी जन्मा आले
मी म्हणते हे माझे छकुले
माझ्या पोटी जन्मा आले
मुखात पण ब्रह्मांड पाहता गळते माझे मी पण ग
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
चंचल हा मनमोहन ग याला कसले बंधन ग
याला कसले बंधन ग
याला कसले बंधन ग