हा हा हा हा हा हा आ आ आ हा हा
पावसात वेडे मन मोर नाचले
श्रावणात भिजले घनघोर नाचले
पाई मी थेंबांची चाल बांधली
झाडांवर वाऱ्याची थाप वाजली
आभाळी मेघांचे ढोल वाजले
पावसात वेडे मन मोर नाचले
या ओल्या सरींची कोणी मशाल जाणली
या इंद्रधनुची कोणी लकीर ओढली
नाचे मन माझे हे पावसात का
मझला मी आले मी माझ्यात का
श्रावणात भिजले घनघोर नाचले
पावसात वेडे मन मोर नाचले
ओ ओ मी डोंगराचा होऊनी उतार धावते
या भिजल्या झाडांना रंग उधार मागते
भिजल्या ह्या वाटा पावसात का
मातीचा दरवळ ह्या पावलात का
श्रावणात भिजले घनघोर नाचले
पावसात वेडे मन मोर नाचले
पाई मी थेंबांची चाल बांधली
झाडांवर वाऱ्याची थाप वाजली
आभाळी मेघांचे ढोल वाजले
पावसात वेडे मन मोर नाचले