पाऊस आला
पाऊस आला, वारा आला
पाने लागले नाचू
थेंब टपोरे गोरेगोरे
भरभर गारा वेचू
पाऊस आला
गरगर गिरकी घेते झाड
गरगर गिरकी घेते झाड
धडधड वाजे दार कवाड
धडधड वाजे दार कवाड
अंगणातही बघताबघता
अंगणातही बघताबघता
पाणी लागे साचू
पाऊस आला
अंगे झाली ओलीचिंब
झुलू लागला दारी लिंब
ओली नक्षी पाऊसपक्षी
ओली नक्षी पाऊसपक्षी
कुणी पाहतो वाचू
पाऊस आला
ओसरुनी सर गेली रे
ओसरुनी सर गेली रे
उन्हे ढगांतुन आली रे
उन्हे ढगांतुन आली रे
इंद्रधनुष्यामध्ये झळकती
इंद्रधनुष्यामध्ये झळकती
हिरे माणके पाचू
पाऊस आला
पाऊस आला, वारा आला
पाने लागले नाचू
थेंब टपोरे गोरेगोरे
भरभर गारा वेचू
पाऊस आला
पाऊस आला
पाऊस आला