आला थंडीचा महिना हा
आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला अहं
मला लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा
हो मला लागलाय खोकला अहं
कोवळ्या मनातं इनलय नाजूक पिरतीच जाळं
काही सुचंना बाई मी करतेया भलतंच चाळं
रोज सपनात येतंय
रोज सपनात येतंय रांगत देखणं बाळ
त्याच्यासाठी मी मांडलाय पाळणा न घेतलाय खेळ
झोप लागं ना बाई गं हा
झोप लागं ना बाई गं सख्याला निरोप पाठवा
मला लागलाय खोकला अहं
मला लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा
हो मला लागलाय खोकला
हं हं
तुमच्या साठीचं आले मोडून माझं मी लग्न
द्या सोडून घर दार चला की माझ्या मागनं
असं किती चालायचं नुस्तच दुरून बघणं
तुमच्या वाचुन झालया मला बी अवघड जगणं
लई वाढलया दुखणं हा
लई वाढलया दुखणं खात्रीचा हकीम भेटवा
मला लागलाय खोकला अहं
मला लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा
हो मला लागलाय खोकला
अहं
नका बिचकू पावण किती तुम्हा सांगावं
घ्या पुढ्यात मजला प्रेमानं कुरवाळावं
पाया पडते मी तुमच्या
पाया पडते मी तुमच्या थोडंसं ऐकाल का वं
बांधा गळ्यात डोरलं कोरून तुमचं नावं
कसं मायेचं पाखरू हा
कसं मायेचं पाखरू झोपलय हलवून उठवा
मला लागलाय खोकला अहं
मला लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा
आला थंडीचा महिना झटपट शेकोटी पेटवा
मला लागलाय खोकला अहं
मला लागलाय खोकला मधाचं बोट कुणी चाटवा
हो मला लागलाय खोकला
अहं अहं अहं अहं