नच साहवतो हा भार
नच साहवतो हा भार
गीतामधुनी गेला निघुनी
गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार
नच साहवतो हा भार
ओठ जरी हे माझे होते
सूर उरी हे तुझेच होते
तुझ्यावाचुनी जीवन माझे करूण आर्त उद्गार
नच साहवतो हा भार
स्वप्नावाचुन आता डोळे
चंद्रावाचुन अंबर काळे
स्वप्नावाचुन आता डोळे
चंद्रावाचुन अंबर काळे
वाट तृषेची कठीण नसता जवळ मेघमल्हार
नच साहवतो हा भार
सरले दिन ते मंतरलेले
पुन्हा परीची शिळा जाहले
तुझ्यामुळे मी वीज जाहले तुझ्यामुळे अंधार
नच साहवतो हा भार
गीतामधुनी गेला निघुनी दूर आज गंधार
नच साहवतो हा भार